परिजातक फुलांची माहिती आणि फायदे | parijatk flowers Information and Benefits

 

पारिजातक फुला बद्दल माहिती | parijatk flowers Information


परिजातक फुलांची माहिती | parijatk flowers Information 


पारिजातकाला प्राजक्त असेही म्हणतात. समुद्र मंथनातून निघालेल्या १४ रत्नापैकी एक रत्न भगवान श्रीकृष्णाचे, आवडते फुल. रुक्मिणी सत्यभामेच्या कथेने या फुलांना अजरामर केले आहे. या फुलावर संस्कृत साहित्यात व पुराणात अनेक लिखाण झालेले आढळते. लहानशा उंचीचा हा वृक्ष अतिशय सुगंधी व ताऱ्यासारखी पांढरी शुभ्र फुले व त्याला साजेसा केशरी देठ. या फुलांच्या लांबलचक माळा इ. स.च्या १३ व्या शतकापर्यंत पुरुष व स्त्रिया दोघेही घालीत. उत्तर रात्रीतली मदहोशी वाढविणारे पारिजातकाचे कोमल फूल जितके हवेहवेसे वाटणारे तितकेच काहीसे नाजूकही. तळहाताच्या उष्णतेनेच कोमेजून जाणारे. 

स्थानिक लोक या पारिजातकाला नवस बोलतात. नवदाम्पत्य या वृक्षाच्या दर्शनाला प्रथम येतात. या झाडाखाली लहान मुलाने जावळं वगैरे संस्कारही करतात. गावात जिथे तिथे पारिजातकाचा सडा पडलेला दिसतो. याच्या फुलाचे वैशिष्ट्य म्हणजे इतर फुलांचे देठ हिरवे किंवा तपकिरी काळा असतो पण या फुलाचा देठ चक्क केशरी असतो. याच्या या देठाचा रंग तयार करण्यासाठी वापर होतो. उत्तम दर्जाचा पिवळा रंग तयार करण्याची ताकद या देठात असते. औषधी दृष्टीने खरा उपयोग याच्या फुलाचा नसून पानांचा आहे.

    

परिजातक फुलांची फायदे | parijatk flowers Benefits


१) मलेरिया (हिवताप) झाल्यास याच्या पानाचा १ चमचा रस, १ चमचा ओव्याची पावडर, अर्धा चमचा मध असे मिश्रण करून ते चाटवितात त्या योगाने थंडी वाजून येणारा ताप पाहता पाहता नष्ट होतो. 

२) सांधे दुखत असल्यास पानाचा रस व आल्याचा रस एकत्र करून खडीसाखरेबरोबर घेतल्यास रोग बरा होतो.

३) गजकर्णावर, खवड्यांवर, सर्पदंशावर पारिजातकाच्या बिया वाटून रस लावावा, आणि पानाचा रस मधाबरोबर पोटात घ्यावा म्हणजे रोग्याला बरे वाटते.

४) पारिजातकाच्या पानाचा रस यकृतविकार, पित्तविकार, अर्श (files) कृती जीर्णज्वरात उपयुक्त ठरतो.

५) पारिजातकाच्या पानाचा काढा कंबरेच्या दुखण्यावर फायदेशीर असतो. 

६) पारिजातकाची फुले वातहर व केसांसाठी लाभदायी असतात.


Read Also :-

•  कण्हेर वनस्पती माहिती

•  जास्वंद फुलाची माहिती

•  झेंडूच्या फुलांची माहिती

•  कमळ फुलांची माहिती

•  मोगरा वनस्पती माहिती


तर मित्रांनो, वरील लेखात आपण परिजातक फुलां बद्दल माहिती जाणून घेतली. मला असे वाटते की मी तुम्हाला वरील लेखात सर्व काही माहिती दिली आहे. 

तसेच तुम्हाला आमचे वरील लेख कसे वाटले याच्याबद्दल comment box मध्ये नक्की कळवा. जर आमच्या लेखात काही चूक असेल तर नक्की सांगा आम्ही ते सुधारू. मित्रांनो तुमच्याकडे या लेखाबद्दल आणखी काही माहिती असेल तर आम्हाला सांगा आम्ही इथे समाविष्ट करू.

तर मित्रांनो, तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की share करा Facebook, Instagram आणि WhatsApp वरती. 

      आमच्या लेखाला वेळ दिल्यामुळे खूप खूप धन्यवाद 🙏





Post a Comment

0 Comments