झेंडूच्या फुलाची माहिती आणि औषधी गुणधर्म | Marigold Flower Information and Benefits In Marathi
या फुलझाडाचेही वेगवेगळे प्रकार व रंग आढळतात. विशेषतः हिवाळ्यात या वनस्पतीला भरपूर फुले येतात. कोणत्याही शुभकार्याला तोरण बांधायचे असेल तर झेंडूफुलांचा उपयोग करतात. झेंडूची फुले बरीच दिवस ताजेतवाने राहतात. याचे झाड फार उंच नसते. परंतु झाडांना भरपूर फुले येतात. फुले आकाराने मध्यम पण सुंदर आकर्षक व टपोरी असतात. वर्षभर झेंडूची फुले घेता येतात. झेंडूमध्ये आफ्रिकन, जाईंट, लेमन बॉल, ऑरेंज बॉल, व्हाईट बॉल (पांढरा मोठा गेंद) फ्रेंच मेरिगोल्ड, पिग्मी, नवरंग झेंडू इत्यादि अनेक प्रकार आहेत. याशिवाय झेंडूच्या फुलावर सतत नवनविन संशोधन सुरूच आहे. झेंडू फुलांना मागणी खूप असल्यामुळे या फुलाची शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे.
झेंडूच्या फुलाविषयी औषधी गुणधर्म | Marigold Flower Benefits In Marathi
१) या फुलापासून एक मलम तयार करतात. त्यामुळे अगदी खोल व्रण असणाऱ्या आणि दूषित जखमा भरून येतात.
२) ज्यावेळी रक्ताची मुळव्याध असेल ती जागा ठणकत असेल तर फुलांचे वाटून पोटीस तयार करतात व गरम गरम असतांना बांधतात त्यामुळे वेदना कमी होतात या पोटिसात ठणका लागू नये म्हणून जायफळही टाकतात. त्यामुळे स्थानीय वेदना शमन चांगले होते.
३) तसेच झेंडूच्या पाकळ्या काढून त्या वाटून त्याचा रस काढावा. रसाइतकेच चांगले तूप टाकावे व तो रस मधातून सकाळ संध्याकाळ १-१चमचा घेतल्यास रक्त मुळव्याघ बरी होते.
४) गांधील माशीने दंश केलेल्या ठिकाणी झेंडूची पाने वाटून लवावीत आणि काही पाने पाण्यात वाटून ते पाणी गाळून प्यायला घ्यावे त्यामुळे वेदना आणि सूज उतरते.
५) झेंडूची पाने पाण्यात उकळून सूज आलेल्या ठिकाणी बांधली असता सूज उतरते किंवा ती गाठ पिकून फुटते.
६) झेंडूच्या फुलांचा रस लावल्याने गजकर्ण आणि खरूज बरी होते. आधी फुलांचा रस लावून त्यावर मग उकळलेल्या पानांचा लेप बांधला असता त्वरित फरक पडतो.
७) झेंडूची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्या असता दात दुखणे कमी होते.
८) झेंडूची फुले खाद्य असून त्यापासून उत्तम प्रकारचे सरबत, गुलकंदासारखा रुचकर मुरब्बा, जाम जेली बनविता येते.
९) फुलांपासून उत्तम सुगंधी अर्क, तेल इत्यादी तयार करता येतात.
१०) पाने-फुले यांच्या चूर्णापासून उत्तम प्रकारचे सुगंधी उटणे बनविता येते.
११) कान ठणकणे, कान फुटणे इत्यादीवर झेंडूच्या पानाचा रस अत्यंत गुणकारी आहे.
१२) झेंडूच्या पाकळ्यांपासून बर्फी, चॉकलेट, पेपरमिंट इत्यादि लहान मुलांचा खाऊ घरच्या घरी बनविता येतो.
झेंडूच्या या विविध गुणांकडे पाहून आज परकीय लोक संशोधन करीत आहेत. आणि ते या फुलांपासून औषध तयार करीत आहेत. परंतु भारतीय मंडळींना मात्र याची किंमत कळलेली नाही. आता झेंडू फुलाला देखील आर्थिक दृष्टीने महत्त्व आलेले आहे.
Read Also :-
तर मित्रांनो, वरील लेखात आपण झेंडूच्या फुला बद्दल माहिती जाणून घेतली. मला असे वाटते की मी तुम्हाला वरील लेखात सर्व काही माहिती दिली आहे.
तसेच तुम्हाला आमचे वरील लेख कसे वाटले याच्याबद्दल comment box मध्ये नक्की कळवा. जर आमच्या लेखात काही चूक असेल तर नक्की सांगा आम्ही ते सुधारू. मित्रांनो तुमच्याकडे या लेखाबद्दल आणखी काही माहिती असेल तर आम्हाला सांगा आम्ही इथे समाविष्ट करू.
तर मित्रांनो, तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की share करा Facebook, Instagram आणि WhatsApp वरती.
आमच्या लेखाला वेळ दिल्यामुळे खूप खूप धन्यवाद 🙏
0 Comments