तुळस झाडांची माहिती मराठी | Tulas plant Information in Marathi

   

तुळशीची माहिती | Tulas Information

 
तुळशीला भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र व श्रेष्ठ मानले गेले आहे. भगवान श्रीकृष्ण आणि तुळस यांचे तर अतिशय महत्त्वाचे नाते आहे म्हणूनच कार्तिक महिन्यात तुळशी विवाह करतात. गाय, गंगा, गीता, गायत्री या प्रमाणेच तुळशीच्या वृक्षाला हिंदू लोक पवित्र मानतात. तुळशीबाबत शास्त्रकार लिहितात. अमृतो मृतरूपासि अमृतत्व प्रदायिनी। त्व मामुद्धर संसारात क्षीरसागार कन्यके ॥ अर्थात हे विष्णुप्रिये आपण अमृत स्वरूप आहात, अमृत प्रदान करता, या संसारात माझा उद्धार करावा म्हणून तुळशी महात्म्य पाहणे आवश्यक आहे. परंतु या वनस्पतीला केवळ धार्मिक महत्त्वच नाहीत औषधीयुक्त गुणही बरेच आहेत. पानापासून मुळ्यांपर्यंत सर्वांगात सर्वोत्तम औषधी गुण समाविष्ट आहेत. पर्यावरणातील प्रदूषण नष्ट करून उत्तम आरोग्यासाठी शुद्ध वायू उपलब्ध करून देणारी वनस्पती म्हणून तुळशीचे महत्त्व लक्षात घेणे आवश्यक आहे.
 
भगवान श्रीकृष्ण आणि तुळस यांचे तर अतिशय महत्त्वाचे नाते आहे म्हणूनच आपण कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह धूमधडाक्यात साजरा करीत असतो. अंगण शेणाने सारविले जाते. तुळशी वृंदावन सजविले जाते. उस, झेंडूच्या फुलांचा मंडप उभारला जातो. तुळशीच्या मुळात बोर, चिंच, आवळा ठेवतात. म्हणूनच म्हण पडली असावी 'बोर भाजी आवळा कृष्ण देव सावळा.' वृंदावनात बाळकृष्णाची मूर्ती नवरा म्हणून दाखल होते. वेटाळातील सर्व जण विवाहासाठी एकत्र येतात, अंतरपाट ठेवला जातो आणि आपल्या घरातील मुला-मुलीप्रमाणे वाजंत्रीच्या घोषात आतिषबाजी करून धूमधडाक्यात लग्न लावले जाते. आलेल्या वन्हऱ्हाडी मंडळींना प्रसाद आणि फराळ दिला जातो. या बाबतीत आपल्या पुराणात एक कथा सांगितली जाते. बाळकृष्ण म्हणजेच विष्णूचे रूप जालंधर दैत्याची भार्या वृंदा, ही पतिव्रता तिच्या पातिव्रत्याच्या तेजाने जालंधर अमर्त्य झाला आणि देवादिकांना, ऋषी-मुनींना त्रास देऊ' लागला.
 
वृंदेचे पातिव्रत्य भंग केल्याशिवाय जालंधरचा मृत्यू असंभव म्हणून विष्णूने जालंधरचे रूप घेऊन वृंदेचे पातिव्रत्य भंग केले. जालंधरला ठार मारले हे समजल्यावर वृंदेने अग्नीत आपला देह अर्पण केला. विष्णूला या घटनेचे खूप वाईट वाटले. त्या वेळी पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वतीने विष्णूला धात्री, मालती आणि तुळशीची रोपे दिली. तुळशीचे रोपटे हे वृंदेचे प्रतीक मानून विष्णू वैकुंठी गेला. वृंदा म्हणजेच तुळशी ही विष्णूला प्रिय झाली म्हणूनच तुळस आणि श्रीकृष्णाच्या विवाहाची परंपरा निर्माण झाली. तुळस ही केवळ देवताच नसून स्त्रियांसाठी वात्सल्यसिंधू माता आहे. सांजसकाळी तिचे स्मरण-पूजन करणे हे पुण्यप्रद मानले आहे. म्हणूनच 'दारी तुळस हिरवीगार तिला माझा नमस्कार' ही लोकश्रद्धा प्रचलित आहे. पूर्वी प्रत्येक हिंदूच्या घरात तुळशी वृंदावन राहात असे व रोज तुळशीची पूजाअर्चा होत असे परंतु सध्या असे क्वचितच आढळते. 

तुळशीच्या श्वेत तुळस आणि कृष्ण तुळस अशा जाती आहे. दोन्हीमधील भेद म्हणजे पाने आणि दांड्याचा रंग हाच असतो. श्वेत तुळशीची पाने व दांड्या हिरव्या असतात. तर कृष्ण तुळशीची पाने व दांड्याचा रंग काळपट असतो. कृष्ण तुळस औषधात जास्त वापरली जाते. कृष्ण तुळशीचे सर्व भाग औषधात वापरतात. घरोघरी जी तुळस आपण बघतो ती श्वेत तुळस असते. आणखी एक कर्पूर तुळस असते तिला कापरासारखा गंध असतो. सध्या आधुनिक संशोधनातून तुळशीचे अनेक आश्चर्यकारक गुणधर्म बाहेर येत आहेत. तुळशीला नावेही अनेक आहेत. तिची पाने चावल्यामुळे तोंडात जी लाळ जमा होते त्यामुळे पचनकारी, अग्निवर्धक, क्षुधा वाढविणारी म्हणून सुरसा, दूषित वायू, रोग आणि आजाराचे किटाणू व्हायरस रूपी-भूत-राक्षसांना पिटाळणारी म्हणून तुळशीला 'भूतघ्नी अपेत राक्षसी' म्हणतात. मिर्गी, आकडी, मूर्च्छा, कुष्ठ आणि रोग ज्यांना अंधश्रद्धने पूर्वजन्माचे पाप म्हणतात. ते देखील तुळशीमुळे बरे होतात म्हणून 'पापघ्नी' म्हटले आहे. हिचे एक नाव 'फुल-पात्री' म्हणजे हिची पाने चावल्यामुळे शरीर शुद्धी होते. 

शरीरात जीवनशक्ती वाढून ती स्थीर रहाते. ही तीव्रतेने प्रभावित करते म्हणून तिला 'तीव्रा वकायस्था' असे म्हटले आहे. तुळशी चिकित्सा फार साधी नी सोपी असल्याने तिला 'सरला' असेही म्हणतात. इंग्रजीत तुळशीला 'होली बेसिल' फ्रेंच भाषेत 'बेसेचिक सेंद' असे म्हणतात. तर संस्कृतमध्ये वृंदा, अमृता, सुगन्धा हिंदीत तुलसी, मराठीत तुळस म्हणतात. तुळशीला केवळ धार्मिक महत्त्व नाही. आजच्या विज्ञानयुगात सारे वायुमंडळ दूषित झाले असून वायू प्रदुषणाचे भयावह संकट जगावर आले आहे. नवीन नवीन रोग उत्पन्न होत आहेत. लोकांना शुद्ध हवा मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत तुळसच सर्वांचे रक्षण करू शकते. प्रत्येक घरासमोर तुळशीची रोपे लावून आम्ही या संकटातून बचाव करू शकतो म्हणूनच आज सर्वत्र 'तुळस लावा- प्रदूषण हटवा' हा नारा आढळतो. घरातल्या स्त्रिया नित्यनेमाने सकाळी तुळशीला पाणी घालून प्रदक्षिणा घालतात. तुळस ही हवा शुद्ध करणारी तिच्याभोवती प्रदक्षिणा घालताना नकळत स्त्रियांना शुद्ध प्राणवायू मिळत जातो. त्यांचे आरोग्य निरामय राहते. पावन तुळशीचे दर्शन घेतल्याने मनही शुद्ध, स्वच्छ होते. यासाठी सध्या मोकळ्या जागेत, बागबागिच्यात तुळशीची झाडे लावून ऑक्सिजन पार्क तयार केले जात आहेत त्याचा निश्चितच उपयोग होईल. तुळशीत खूप सारे औषधी गुण विद्यमान आहेत.  
   
विशेष महत्त्वाची वाटते. तिचे मानवावर अनंत उपकार आहेत. हिची पाने, फुले, मजुळा, मुळ्या, खोड या सर्वांचा औषधीरूपाने उपयोग होऊ शकतो. म्हणूनच प्रत्येक घरी तुळशी वृंदावनाची प्रथा सुरू झाली. तुळशीची पूजा करून प्रदक्षिणा घालतांना महिलांना प्राणवायूयुक्त शुद्ध हवेचा भरपूर लाभ मिळतो व स्त्रियांचे आरोग्य उत्तम राहते, म्हणून या पूजेमागे अंधश्रद्धा नसून तिथे उत्तम आरोग्याची भावना आहे. तुळशी इतका निसर्गाचा डॉक्टर दुसरा नाही. फ्लॅट संस्कृतीमध्ये तुळशी वृंदावन शक्य नसल्यास कुंडीत रोप लावावे. अशाप्रकारे आधुनिक शहरातील वाढल्या प्रदूषणाला या मुळे काही प्रमाणात आळा बसेल, हे निश्चित.

Read Also :-


तर मित्रांनो, वरील लेखात आपण तुळस झाडाबद्दल माहिती जाणून घेतली. मला असे वाटते की मी तुम्हाला वरील लेखात सर्व काही माहिती दिली आहे. 

तसेच तुम्हाला आमचे वरील लेख कसे वाटले याच्याबद्दल comment box मध्ये नक्की कळवा. जर आमच्या लेखात काही चूक असेल तर नक्की सांगा आम्ही ते सुधारू. मित्रांनो तुमच्याकडे या लेखाबद्दल आणखी काही माहिती असेल तर आम्हाला सांगा आम्ही इथे समाविष्ट करू.

तर मित्रांनो, तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की share करा Facebook, Instagram आणि WhatsApp वरती.

 आमच्या लेखाला वेळ दिल्यामुळे खूप खूप धन्यवाद 🙏


Post a Comment

0 Comments