तुळशी औषधी गुणधर्म | Tulsi plant benifits
(1) तुळस औषधी व आरोग्यवर्धक आहे. तुळशीची १० पाने रोज सकाळी चावून खाल्ल्यास सर्दी-अपचन यासारखे विकार होत नाहीत.
(2) दाढ दुखत असल्यास तुळशीच्या पानाचा रस व कापूर- लिंबाच्या रसात गोळी बनवावी ती दातात ठेवली असता दाढदुखी थांबते.
(3) तुळशीमुळे ओझोन हा वायू बाहेर पडतो आणि त्यामुळे घराभोवतालचा परिसर अति शुद्ध होतो. रशियन औषधतज्ज्ञांनी तर तुळशीपासून अक्षरश: शेकडो औषधे निर्माण केली आहेत. हल्ली तर कर्करोगावर ही (कॅन्सर) तुळशीच्या रसाचा उपयोग औषधासाठी केला जातो.
(4) तुळस उत्तम कृमिनाशक आहे. पायाच्या चिखल्या, गजकर्ण, खरूज या त्वचेच्या विकारांमध्ये तुळशीच्या पानाचा रस आणि लिंबू रस बाहेरून लावण्यासाठी व पोटात घेण्यासाठी उपयुक्त आहे.
(5) विषारी किटक, गांधीलमाशी, विंचू चावल्यावर आग शमविण्यासाठी तुळशी वृंदावनातील माती, मिरी, तुळशीची पाने व झेंडूची पाने यांचा रस लावावा.
(6) सर्दी, खोकला व त्याबरोबर ताप असे एकत्र असल्यास तेव्हा तुळशीचा रस द्यावा किंवा ५-६ पाने चावून खावीत. तुळशीचा रस जास्त असलेले औषध म्हणजे 'त्रिभुवनकीत' या गोळ्या मध किंवा खडीसाखरे सोबत घेतल्यास हमखास गुण येतो. मलेरियाच्या तापात तुळशीचा बहुमोल उपयोग होतो. तुळस, मिरी, गूळ यांच्या काढ्यात लिंबू पिळावे आणि तो गरम काढा रुग्णास पाजावा नंतर पांघरूण घेऊन झोपण्यास सांगावे या काढ्याने घाम सुटून मलेरियाचा ताप उतरतो.
(7) सर्दी, कफ पडसे या विकारांवर तुळशीची पाने, सुंठ, आलं, गूळ, मिरी, घालून उकळून काढा करून घ्यावा गुण येतो. तुळशीच्या पानांचा रस मधासोबत घेतल्यास सर्दी, खोकला आणि दुखत असलेला गळा बरा होतो. कोरडा खोकला व मुलांच्या दम्या वर तुळशीची बी, कांदा आणि आले वाटून त्यात मध मिसळावे हे चाटण फारच गुणकारी असते. तुळस ही कफनाशक आहे.
(8) तुळशीच्या बियांची खीर पौष्टिक आणि बलवर्धक असते. वीर्य शुद्धीकरण करते.
(9) तुळस आणि लिंबू रस त्यात थोडी सुंठ पावडर मिसळून दिल्यास पोटदुखी थांबते.
(10) कान ठणकत असल्यास तुळशीच्या पानाचा रस काढून थेंब थेंब कानात टाकावा.
(11) तुळशीचा दोन चमचे रस खडीसाखरेबरोबर घेतल्यास भूक चांगली लागते.
(12) बरेच वेळा एखादी व्यक्ती काही कारणाने बेशुद्ध होते त्यावेळी तुळशीच्या रसात सैंधव मीठ मिसळून त्याचे दोन-दोन थेंब नाकात टाकावे म्हणजे मूर्च्छा दूर होते.
(13) डोके दुखीवर मंजिऱ्याची पूड तपकिरीसारखी ओढावी तसेच पानाचा रस डोक्यावर लावावा.
(14) तोंडाला छाले आल्यास तुळशीची पाने आणि चमेलीची पाने एकत्र चावल्यास छाले कमी होतीत.
(15) भाजलेल्या आणि कापलेल्या जागेवर तुळशीच्या पानाचा रस खोबरेल तेलात मिसळून लावल्यास आराम मिळतो.
(16) तोंडावर येणाऱ्या मुरम आणि पुटकुळ्यांसाठी तुळस हे उत्तम औषध आहे. तुळशीचा रस आणि लिंबाचा रस यांचे मिश्रण झोपण्यापूर्वी तोंडाला चोळा आणि सकाळी उठल्यानंतर धुऊन टाका मुरम आणि पुटकुळ्या पार जातात. तुळशीची पाने वाटून त्याचे उटणे करता येते ते चेहऱ्याला लावल्यास अंगकांती व चेहरा तजेलदार दिसतो.
(17) मूत्ररोगात तुळशीचा रस आणि लिंबाचा रस एकत्र मिसळून दिल्यास लघवी साफ होते.
(18) तुळशीचे बी वाटून मधाबरोबर घेतल्यास रक्तातिसार, स्वप्नदोष, प्रमेह इ. धातूसंबंधी विकार दूर होतात.
(19) स्त्रियांच्या मसिक पाळीत जर भरपूर रक्तस्राव होत असेल व चक्कर येत असतील तर तुळशीच्या रसात मध मिसळून दिल्यास लाभ होतो.
(20) स्मरणशक्ती वाढविण्यासाठी सकाळी तुळशीची ४-५ पाने पाण्याबरोबर गिळावीत.
(21) हृदय व मेंदूला शीतल ठेवण्यास तुळशी रस अमृताप्रमाणे आहे. तुळशीमुळे दमा व अॅलर्जी रोगापासून बचाव होतो. मलेरियाचे जंतू नाहीसे करण्याकरिता तुळशी ही वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते तिच्या पासून बनलेली तुळशीयुक्त अगरबत्ती घरातील वातावरण शुद्ध ठेवायला मदत करू शकते.
(22) तुळस अँटिसेप्टीक असल्यामुळे जखमांसाठी गुणकारी आहे. त्वचेवर होणाऱ्या जखमा तुळशीच्या रसाने धुतल्यास जखमा लवकर बऱ्या होतात.
(23) आषाढी, कार्तिकीची वारी अखंडपणे करणारे वारकरी तुळशीची माळ गळ्यात घालतात.
Read Also :-
तर मित्रांनो, वरील लेखात आपण तुळस बद्दल माहिती जाणून घेतली. मला असे वाटते की मी तुम्हाला वरील लेखात सर्व काही माहिती दिली आहे.
तसेच तुम्हाला आमचे वरील लेख कसे वाटले याच्याबद्दल comment box मध्ये नक्की कळवा. जर आमच्या लेखात काही चूक असेल तर नक्की सांगा आम्ही ते सुधारू. मित्रांनो तुमच्याकडे या लेखाबद्दल आणखी काही माहिती असेल तर आम्हाला सांगा आम्ही इथे समाविष्ट करू.
तर मित्रांनो, तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की share करा Facebook, Instagram आणि WhatsApp वरती.
आमच्या लेखाला वेळ दिल्यामुळे खूप खूप धन्यवाद 🙏
0 Comments