गुलाब फुलाची माहिती | Rose flower Information
गुलाबाला फुलांचा राजा असे म्हणतात. या झाडास काटे असतात. फुलांच्या पुष्पमुकुटास पाच पाकळ्या असतात. गुलाबाच्या अनेक जाती आहेत. या जाती वेगवेगळ्या रंगांची फुले निर्माण करतात. जहांगीर बादशहा व नुरजहान यांचे आवडते फुल गुलाब होते. म्हणूनच त्यांनी भारताचे नंदनवन काश्मीर मधील श्रीनगर येथे शालिमार, निशांत गार्डन उभारले आजही ते याची साक्ष देतात. सुंदर स्त्रीच्या गालांना गुलाबाचीच उपमा दिली जाते. असे हे बहुगुणी फूल आहे. सुगंधी फूल म्हणून देवाच्या पूजेत त्याला अग्रस्थान आहे. शतपत्री, गुलाबफूल, रोझा, रोजफ्लावर आदी नावाने गुलाब ओळखला जातो. मंद, मधुर, मोहक सुगंध देणाऱ्या या गुलाब गुच्छानी आपण पाहुण्यांचे स्वागत करतो, गुलाबदाणीतही लावतो आणि प्रसंगी स्त्रियांच्या वेणीवरही तो लावला जातो.
हल्ली हॉटेल, कार्यालये, उपाहारगृहे अनेक स्वागत समारंभ किंवा औपचारिक, अनौपचारिक भेटीसाठी गुलाबाची फुले वापरतात. देवादिकांना गुलाब फुलांच्या माळा अर्पण करण्याची प्रथा आहे. शिवाय परदेशी पाठविण्यासाठीही गुलाबांची मागणी वाढत आहे. गुलाबाचा औद्योगिक किंवा औषधी असे दोन्ही प्रकारचे उपयोग आहेत. गुलाब पाणी, गुलाबाचे अत्तर, गुलकंद गुलाबाचे शरबत, गुलाबाचे तेल यांचा औद्योगिक उपयोगात समावेश होतो. तर गुलाबाचे औषधी उपयोग अक्षरश: अगणित आहेत.
गुलाब अनेक प्रकारचे असतात तरी औषधी म्हणून फक्त गुलाबी रंग असलेल्या गुलाबाचाच वापर केला जातो. गुलाब थंड, हृदय आणि मेंदूची शक्ती वाढविणारा आहे. गुलाब गुणधर्माने तुरट, सुगंधी व वातहारक आहे. गुलाबाचा अर्क काढला जातो त्यापासून अत्तर-तेल तयार केले जाते. गुलाबात अनेक औषधी गुणधर्म आढळतात.
गुलाब फुलचे औषधी गुणधर्म | Rose flower Benefits
१) मोठ्या विलायचीच्या साली ३ ग्रॅम घेऊन २५० ग्रॅम गुलाब अर्क उकळून कॉलरा झालेल्या रोग्यास पाजले असता फायदा होतो.
२) १२५ मिली ग्रॅम गुलाबाचे अर्क आणि ६० मिली पाणी टाकावे. नंतर त्यात किसमिस टाकून हे भांडे चांदण्या रात्री स्वच्छ ठिकाणी रात्रभर ठेवावे. सकाळी चिमट्याने किसमिस काढून घ्यावेत आणि एकेक करून चावून खावेत. सर्व किसमिस खावून झाल्यानंतर शिल्लक राहिलेले अर्काचे पाणी सेवन करावे, या प्रकारे रोज उपचार केला तर हृदयाची धडधड वाढणे, दुर्बलता घालविण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय आहे.
३) शरीरातील उष्णता उन्हाळ्यातील दाह कमी करण्यासाठी गुलकंदाचे रोज चमचाभर सेवन करावे. एखाद-दुसऱ्या गुलाबी फुलाचे झाड आपणाकडे असेल तर उमललेल्या फुलाच्या पाकळ्या साफ करून काचेच्या बरणीत टाकाव्या व त्यावर थोडी खडीसाखर टाकून उन्हात ठेवावी असे महिनाभर करावे. त्यानंतर पुन्हा महिनाभर सूर्यकिरणात ठेवावे. त्यात २० ग्रॅम प्रवाळ भस्म टाकावे म्हणजे घरच्याघरी प्रवाळयुक्त उत्तम गुलकंद तयार होतो.
४) शौचास साफ होत नसेल, ग्लानी येत असेल तर सुकलेल्या गुलाब पाकळी साखरेबरोबर चावून खाव्यात.
५) नेत्ररोगात गुलाबपाणी डोळ्यात घालावे रोग नियंत्रणात येतो.
६) सुतशेखर व गुलाबपाणी अतीव डोकेदुखीवर उपयोगी आहे.
७) ज्यावेळी डोळा लाल होत असेल त्यावेळी दोन थेंब तुरटीचे, पाव कप गुलाबपाणी आणि पाऊणा कप साधे पाणी घेऊन त्या मिश्रणाने डोळे धुवावे आणि मग कसे डोळे तेजस्वी होतात ते पाहा.
८) गुलाबाच्या नियमित सेवनाने रंग निखरतो. हृदयाची धडकन कमी होते. रक्ती मुळव्याध व श्वेत प्रदर कमी होतो.
९) गुलाबाच्या फुलापासून अत्तर काढतात. अत्तराचा उपयोग सुगंधी म्हणून होतोच पण ज्याचा गुणधर्मच थंडावा आहे. अशा औषधाने शरीरातील उष्णताखडे विरघळतात..
१०) गुलाबात व्हिटामिन सी अधिक मात्रेने असते.
११) गुलाबाचे शरबत हृदय आणि मस्तकाला बल व शीतलता प्रदान करते.
१२) शरीराला दुर्गन्धयुक्त घाम येत असेल तर फूल कुस्करून पाण्यात टाकावीत आणि नंतर शरीराला लेप लावून नंतर स्नान करावे. वास जाईल..
१३) कानात ठणका होत असतील तर गुलाब फुलांचा ताजा रस कानात टाकावा.
१४) उन्हाळ्यात उष्णतेचा (उन्हाळीचा) त्रास होत असल्यास डोक्यावर गुलाबजलाची पट्टी लावावी.
१५) जर पूर्ण शरीरात उष्णतेमुळे आग होत असल्यास हात-पायाचे तळवे चंदनात गुलाबजल मिसळून लेप लावावा.
१६) दातदुखी किंवा हिरड्यातून रक्त येत असल्यास गुलाबाचे फूल कुस्करून खावे. एकंदरित गुलाब ही शीतवीर्य वनस्पती उसल्याने उष्णतेच्या सर्व विकारावर तसेच पित्त विकारापैकी अल्सर, पोटदुखी, मुळव्याध यावर सुद्धा गुलाबाचा उपयोग होतो.
आज आधुनिक जगात गुलाबाच महत्त्व वाढलं आहे. ते केवळ रूपरंग आणि गंधामुळे औषधामुळे नाही तर ते व्यापारीतत्त्वामुळे, शेतीतून मिळणाऱ्या आर्थिक फायद्यामुळे. शेतकऱ्यांसाठी हे एक आधुनिक जोडपीक असून त्यामूळे भरपून पैसा मिळतो. हॉलंड, जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड या राष्ट्रांमध्ये गुलाबाची शेती आणि त्याच्या व्यापाराने चांगलीच मुळं धरली आहे. महाराष्ट्रात सुद्धा नाशिक, इचलकरंजी, सांगली, बार्शी, डहाणू एवढेच नव्हे, तर विदर्भातही ही शेती केली जात आहे. यामुळे लोकांना रोजगारही मिळत आहे. पण अजूनही याचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होणे गरजेचे आहे. गुलाबाच्या बहारासाठी हिवाळा अत्यंत उत्तम काळ असतो. गुलाबाच्या लागवडीसाठी प्रामुख्याने थंड आणि कोरडे हवामान, स्वच्छ हवा भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक आहे.
एकंदरित या गुलाबाच्या गुलाबी स्वप्न दाखविणाऱ्या गुलाबात केवळ औषधीयुक्त गुणच नाहीत, तर आर्थिक फायदा आहे हे ध्यानात ठेवून ग्रामीण महाराष्ट्राने याकडे लक्ष देणे किफायतशीर ठरेल हे निश्चित.
Read Also :-
तर मित्रांनो, वरील लेखात आपण गुलाब फुलाबद्दल माहिती जाणून घेतली. मला असे वाटते की मी तुम्हाला वरील लेखात सर्व काही माहिती दिली आहे.
तसेच तुम्हाला आमचे वरील लेख कसे वाटले याच्याबद्दल comment box मध्ये नक्की कळवा. जर आमच्या लेखात काही चूक असेल तर नक्की सांगा आम्ही ते सुधारू. मित्रांनो तुमच्याकडे या लेखाबद्दल आणखी काही माहिती असेल तर आम्हाला सांगा आम्ही इथे समाविष्ट करू.
तर मित्रांनो, तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की share करा Facebook, Instagram आणि WhatsApp वरती.
आमच्या लेखाला वेळ दिल्यामुळे खूप खूप धन्यवाद 🙏
0 Comments