Lotus flower

  

कमळ फुलांची माहिती | Lotus Flower Information In Marathi

आयने ते परायणे दूर्वा रोहन्तु पुष्पिणी ।

हृदाश्च पुण्डरीकाणी समुद्रस्थ गुहा इथे ।

याचा अर्थ हे अग्ने तू जिकडून आलास तिथे आणि जिकडे जाणार आहेस तिथे भूमी फुललेल्या दूर्वांनी आच्छादित होवो. जिकडे तिकडे सरोवर आणि त्यात कमळे प्रफुल्लित असोत. खरोखर समुद्राची मंदिरे ती हीच कमळपुष्प सर्व देवतांचे आवडते फुल विशेषतः लक्ष्मीला अधिक आवडते. तसेच कमळचिन्ह बुद्ध देवतांचे आसन समजले जाते. भारतीय गणराज्याने देखिल कमळ पुष्पाला आपले प्रतीक मानले आहे. 

हिंदूंच्या धार्मिक समारंभात कमळपुष्पाला अतिशय महत्त्व आहे. तसेच चित्रकार शिल्पकार, निरनिराळ्या प्रकारच्या कोरीव कलाकृतींची निर्मिती करणारे सर्व कलाकार, लेखक, कवी आदींचेही अत्यंत आवडते फूल आहे. प्राचीन भारतात लहानमोठी अनेक जलाशये होती. ती कमलपुष्पांनी खचून भरली होती. रामायण, महाभारत व मौर्योत्तर कालीन साहित्यात गांधार मथुरा इथे शिल्पात देठासकट कमळे काढलेली आहेत. बहुतेक हिंदू देवता कमलासनास्थ असतात. कमळाचा उल्लेख जागोजागी आढळतो.

कमळ हे भारतीय संस्कृतीचे महान प्रतीक आहे. सर्व प्रतीकांचा राजा असे कमळास म्हणतात. ईश्वराच्या सर्व अवयवास कमळ उपमा देतात. कमळनयन, कमळवदन, करकमल, पदकमळ, हृदयकमळ असे म्हणतात.

कमळाजवळ अलिप्तपणा हा गुण आहे. पाण्यात असून ते पाण्यावरच राहते. चिखलात असून ते चिखलाच्या वर फुलते. कमळ अनासक्त आहे.

कमळाचे अनेक प्रकार आहेत. कमळपुष्प हे पांढरे, पिवळे, गुलाबी, लाल, निळे, जांभळे ह्या रंगाच्या फिक्या व गडद अशा अनेकविध छटांत आढळते. परंतु त्यातील श्वेत, रक्त, नील कमळाला विशेष महत्त्व आहे. पांढऱ्या (श्वेत) कमळास पुंडरिक, रक्तकमळास कोकनद, नीलला इंदिवर असे म्हणतात. कमळपुष्पाला पदम तसेच पुंडरिक असेही म्हणतात. सर्व साधारणपणे कमळाचा वास मंदमधूर असतो. त्याचा सुवास दूरवर पसरत असतो.

परंतु सुगंधाबरोबरच कमळात अनेक औषधीगुण आहेत.

 

कमळ फुलाचे फायदे | Lotus flower Benefits In Marathi 

१) कमळाच्या पाकळ्या सेवन केल्याने माणसाचे शरीर सुंदर व सतेज होते.

२) कमळ फुलाच्या सेवनाने हृदयाचे धडधडणे व छातीतील कळा कमी होतात, शरीरातील पित्तही थांबते. 

३) कमळाच्या फुलाचे किंवा कळीचे सरबत घेतल्याने शरीरातील दाह शांत होतो, चेहरा खुलतो, चेहऱ्यावरील यौवनपीटिका कमी होतात. त्वचा नितळ होते. 

४) कमळाचे चूर्ण मध-खडीसाखर-लोणी यांच्या बरोबर घेतल्यास कमी रक्तातिसार असणारे रोगी चांगले होतात.

५) कमळाची पाने, फुले, देठ, कंद, बी याचा उपयोग खाद्यपदार्थ म्हणूनही केला जातो. या पासून भाजी, लोणचे यासारखे उपयोग केला जातो.

६) कमलपुष्पापासून गुलकंद, मध, व अत्तर तयार केले जाते. 

७) कमळफुलाचा उपयोग आव, हगवण, मळमळणे, देवी येणे, डोळे येणे, गजकर्ण, नायटा वगैरेवर केला जातो.

एकंदरित कमळ फुलांना देशात तसेच परदेशात मागणी आहे. असे हे कमळ औद्योगिक दृष्ट्या पैसा मिळविण्यास निश्चितच महत्त्वाचे आहे.


Read Also :- 

•  तुळस वनस्पती माहिती

•  गुलाब फुलांची माहिती

•  झेंडूच्या फुलांची माहिती

•  पारिजात फुलांची माहिती

•  जास्वंद फुलाची माहिती

•  कोविड 19 आणि आजार टाळण्यासाठी आरोग्यदायी सवयी


तर मित्रांनो, वरील लेखात आपण कमळ फूला बद्दल माहिती जाणून घेतली. मला असे वाटते की मी तुम्हाला वरील लेखात सर्व काही माहिती दिली आहे. 

तसेच तुम्हाला आमचे वरील लेख कसे वाटले याच्याबद्दल comment box मध्ये नक्की कळवा. जर आमच्या लेखात काही चूक असेल तर नक्की सांगा आम्ही ते सुधारू. मित्रांनो तुमच्याकडे या लेखाबद्दल आणखी काही माहिती असेल तर आम्हाला सांगा आम्ही इथे समाविष्ट करू.

तर मित्रांनो, तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की share करा Facebook, Instagram आणि WhatsApp वरती.

     आमच्या लेखाला वेळ दिल्यामुळे खूप खूप धन्यवाद 🙏