दुर्वा वनस्पती माहिती आणि फायदे मराठी | Durva plants Information and Benefits in Marathi


दुर्वा वनस्पती माहिती | Durva plants Information In Marathi 

 

'दूर्वा' ही एक आश्चर्यकारक अन् महत्त्वपूर्ण वनस्पती असून ती अत्यंत गुणकारी, उपयुक्त, सर्व प्राणिमात्रांसाठी आरोग्यवर्धक व अनेक रोगांवर रामबाण असल्याचे सिद्ध झाले आहे. 

दूर्वाला हिंदीत दुब' संस्कृतात अमृता, अनंता, गौरी, दूर्वा मराठीत दूर्वा, हरळी' इंग्रजीत conch grass. (कोंच ग्रास) असे म्हणतात.


दुर्वांचे औषधीयुक्त महत्त्व | Medicinal  importance of Durva


1) नाकातून उष्णतेने रक्त पडत असल्यास दूर्वांचा रस नाकात पिळतात.

2) उचकीवर दूर्वाच्या मुळ्यांचा रस देतात. 

3) मुलांना जंत झाल्यास दूर्वायुक्त पाणी देतात.

4) गरोदरपणात स्त्रियांना ओकाऱ्या, चक्कर येत असेल तर दूर्वांचे पाणी देतात. 

5) विंचू दंशावर दूर्वाचा रस लावल्यास दाह थांबतो.

6) ताप आलेल्या माणसास तसेच तापाची तीव्रता वाढल्यास तांदूळ व दूर्वा एकत्र वाटून त्याचा लेप मस्तकावर लावला असता तापाची उष्णता वाढत नाही.

7) रक्तीमुळव्याध अतिसार, आमांश वर दूर्वा व त्याच्या मुळ्याचा रस दिल्यास फायदा होतो. 

8) शरीरात पित्ताचा जोर वाढला तर दूर्वाची मुळी चटणीप्रमाणे बारीक वाटून खडीसाखर व गाईच्या दुधातून सकाळी घ्यावे.

9) त्वचेच्या विकारात दूर्वाच्या काढ्याचा धुण्यासाठी उपयोग होतो. बोटामध्ये होणाऱ्या चिखल्यांबर दूर्वाच्या रस लावतात याने आग कमी होते.

10) मधुमेह झालेल्या माणसांनी व चर्मरोगी यांनी दूर्वावर चालल्यास फायदा होतो.

11) महिलांच्या रक्त प्रदरात पांढऱ्या चंदनाचा बारीक भुसा व खडीसाखर बारीक वाटून दूर्वाच्या रसातून दिल्यास फायदा होतो. 

12) दूर्वाच्या रसामुळे पोटातील विकार नष्ट होतात.

13) दूर्वायुक्त पाणी प्यायल्याने मेदू शांत व उत्तेजित राहतो..

14) ज्यांच्या अंगात दाह असेल त्यांनी सकाळी सायंकाळी दूर्वावरून किंवा हरळीवरून ५ ते १० मिनिटे चालावे अंगातील कडकी निघून जाते.

15) ओकारीद्वारे रक्त जात असेल तर दूर्वाच्या रसाचा उपयोग गुणकारी मानला जातो..

16) आदिवासी लोक जखम किंवा घावावर दूर्वांना बारीक वाटून त्याचा लेप बांधतात.

17) आम्लपित्त, जागरण यामूळे डोळ्यांची आग होत असेल तर दुर्वा २५ धुऊन चावून खाव्यात.

18) संगणकासमोर सतत बसून डोळ्यांवर येणारा ताण दूर्वाच्या रसामुळे कमी होतो.


Read Also :-

•  कमळ फुलांची माहिती

•  झेंडूच्या फुलांची माहिती

•  पारिजात फुलांची माहिती

•  गुलाब फुलांची माहिती

•  मोगरा वनस्पती माहिती

•  कोविड 19 आणि आजार टाळण्यासाठी आरोग्यदायी सवयी


तर मित्रांनो, वरील लेखात आपण दूर्वा बद्दल माहिती जाणून घेतली. मला असे वाटते की मी तुम्हाला वरील लेखात सर्व काही माहिती दिली आहे. 

तसेच तुम्हाला आमचे वरील लेख कसे वाटले याच्याबद्दल comment box मध्ये नक्की कळवा. जर आमच्या लेखात काही चूक असेल तर नक्की सांगा आम्ही ते सुधारू. मित्रांनो तुमच्याकडे या लेखाबद्दल आणखी काही माहिती असेल तर आम्हाला सांगा आम्ही इथे समाविष्ट करू.

तर मित्रांनो, तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की share करा Facebook, Instagram आणि WhatsApp वरती.

        आमच्या लेखाला वेळ दिल्यामुळे खूप खूप धन्यवाद 🙏






Post a Comment

0 Comments