कण्हेर फूल संपूर्ण महिती मराठी | Kaner Flower Information in Marathi

 

Kaner Flower


कण्हेर झाडाची माहिती | kanher plants Information 

कन्हेरीचे झाड भारतात मंदिरामध्ये, बगिच्यात आणि घरातील परसबागेत लावली जातात रंगावरून कन्हेरीच्या तीन जाती समजाल्या जातात. यांची फुले लाल, पांढरी आणि पिवळी अशी तीन प्रकारची असतात. कन्हेरीला वर्षभर फुले येतात. झाड साधरणत: १०-१२ फुट उंच असते, पान ६-७” लांब व नोकदार असतात. 

कन्हेरी एक प्रकारचे विष असले तरी त्वचारोगात त्याचा खूप चांगला उपयोग होतो. पांढरा कन्हेर जास्त विषारी पण औषधीयुक्त असतो. कन्हेरीला संस्कृतात करवीर, मराठीत कन्हेर-हिंदीत कनेर बंगालीत करवी, इंग्रजीत olender ओलियनडेन म्हणतात याचे औषधी उपयोग याप्रमाणे आहेत.

कण्हेर झाडाचे औषधी गुणधर्म | kanher plants Benefits 

१) कन्हेरीची पाने किंवा फुले वाळविल्यानंतर खूप बारीक वाटावीत आणि वसगाळ करावीत चूर्णाची नस ओढली असता चोंदलेले नाक मोकळे होते. नाक चोंदल्यामुळे होणारी डोकेदुखीही यामुळे बरी होते.

२) साप-विंचू या सारख्यांच्या देशावर पांढऱ्या कन्हेरीच्या मुळीचा लेप करतात आणि दंश झालेल्या जागी लावतात. याने फायदा होतो. 

३) पांढऱ्या कन्हेरीच्या झाडाची सालीचा काढा करून मोहरीच्या तेलात आटवून त्याचा लेप लावल्यास चर्मरोग बरे होतात.

४) कन्हेरीची पाने १०० ग्रॅम घेऊन दीड लिटर गरम पाण्यात उकळावीत. अर्धा लिटर पाणी शिल्लक राहिल्यानंतर भांडे खाली उतरवून पाने त्यात घुसळावीत आणि नंतर ते पाणी गाळून घ्यावे. त्या पाण्यात २५० ग्रॅम तिळाचे तेल टाकून भांडे पुन्हा विस्तवावर ठेवावे. सर्व पाणी जळून गेल्यानंतर फक्त तेल शिल्लक राहील ते थंड झाल्यावर बाटलीत भरावे हे तेल लावल्याने खरूज, गजकर्ण बरे होते. याशिवाय तेलाने मालिश केल्यावर संधिवात, लकवा, सांधेदुखी बरी होते. 

५) कन्हेरीची पाने तिळाच्या तेलात उकळून ते गाळून घ्यावे. हे तेल लावल्यानंतर साधारण प्रकारचे त्वचारोग दूर होतात. 

६) कन्हेरीची साल त्वचारोग, जखमा व सुजेवर उपयोगी आहे.

७) कन्हेरीच्या पानाच्या काढ्याने काही दिवस नियमितपणे स्नान केल्यास कुष्ठरोगात फायदा होतो. 

८) कन्हेरीची साल पाण्यात वाटून रक्तातील दोषामुळे निर्माण झालेल्या खरूज, डाग आणि चट्ट्यांवर लेप करून लावली असता उपयुक्त होते. डाग पूर्णपणे बरे होत नाहीत तोपर्यंत नियमितपणे त्याचा वापर करीत राहावे.

९) कन्हेरीचे मुळं औषधात वापरतात. कन्हेरी ही विषारी वनस्पती आहे. कन्हेरीच्या चिकामुळे अंगाची आग होते व फोड येतात म्हणून सावधगिरी बाळगावी.

सूचना- (कन्हेर विषारी वनस्पती असल्यामुळे याचा वापर करताना तज्ज्ञ वैद्याचा सल्ला घ्यावा)


Read Also :- 

•  झेंडूच्या फुलांची माहिती

•  मोगरा वनस्पती माहिती

•  गुलाब फुलांची माहिती

•  पारिजात फुलांची माहिती

•  कमळ फुलांची माहिती


तर मित्रांनो, वरील लेखात आपण दूर्वा बद्दल माहिती जाणून घेतली. मला असे वाटते की मी तुम्हाला वरील लेखात सर्व काही माहिती दिली आहे. 

तसेच तुम्हाला आमचे वरील लेख कसे वाटले याच्याबद्दल comment box मध्ये नक्की कळवा. जर आमच्या लेखात काही चूक असेल तर नक्की सांगा आम्ही ते सुधारू. मित्रांनो तुमच्याकडे या लेखाबद्दल आणखी काही माहिती असेल तर आम्हाला सांगा आम्ही इथे समाविष्ट करू.

तर मित्रांनो, तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की share करा Facebook, Instagram आणि WhatsApp वरती.

    आमच्या लेखाला वेळ दिल्यामुळे खूप खूप धन्यवाद 🙏










Post a Comment

0 Comments