मोगरा फुलाची संपूर्ण माहिती | Mogra Flower Information In Marathi


Jasmine flower


मोगरा फुलांची माहिती | Mogra flowers Information  
    

उन्हाळ्यामध्ये फुलणाऱ्या फुलात मोगऱ्याच्या फुलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण ही फुले शुभ्र पांढरी, टवटवीत, टिकाऊ आणि अत्यंत सुगंधी अशी या विशिष्ट प्रकारच्या सुगंधामुळे या फुलाचा अनेक प्रकारे उपयोग केला जातो.

मोगऱ्याची फुले देवपूजेसाठी अत्यंत आवडीने वापरली जातात. घरामध्ये सुगंध पसरविण्यासाठी मोगऱ्याच्या फुलांचा सुरेख वापर करता येतो. फुलदाणीत किंचित लांब दांड्यावरील मोगऱ्याच्या फुलांचे गुच्छ ठेवून फुलदाणी पंख्याखाली ठेवल्यास घरभर सुगंध दरवळतो व घरात प्रसन्न असे वातावरण राहते. उन्हाळ्यात बहुतेक घरातून दिवसभर कूलर सुरू असतात. कूलरच्या पाण्याच्या टाकीत १०-१२ मोगऱ्याच्या टपोऱ्या कळ्या टाकून ठेवल्यास सर्वत्र सुगंध पसरतो. मोगऱ्याच्या दुहेरी टपोऱ्या फुलांचे हार फारच छान बनतात. डोक्यात माळण्यासाठी गजरा आणणे म्हणजे शृंगाराची प्रमुख खूण मानली जाते. देवाच्या हारासाठी याच्या कळ्या फुलांचा सुरेख वापर करता येतो. या फुलांच्या चूर्णापासून सुगंधी अगरबत्त्या बनविल्या जातात.

मोगऱ्याच्या फुलांपासून उत्तम प्रकारचे अत्तर तयार करतात. मोगऱ्याच्या फुलाचा अर्क काढून त्याचा अनेक उत्पादनांत वापर करता येतो. या अर्कापासून साबण, सुगंधी तेल, क्रीम, फेस पावडर इत्यादी बनविता येतात.


मोगरा फुलाचे फायदे |Benefits of Mogra flower in Marathi


१) सर्दी-पडसे इत्यादी किरकोळ रोगांवर मोगऱ्याची ताजी फुले दिवसभर हुंगत राहणे त्यामुळे त्रास कमी होईल. 

२) उन्हाळ्यात डोळ्यांची आग होत असेल तर ताजी टवटवीत उमललेली दोन-तीन फुले पाण्यात बुडवून काढावी व डोळ्यांवर दोन मिनिटे घट्ट दाबून धरावी, डोळ्यांना थंडावा प्राप्त होऊन बरे वाटेल.  

३) मोगऱ्याच्या कळ्या फुलांचा आणखी एक उपयोग म्हणजे उन्हाळ्यात आपण माठाचे पाणी पितो, त्या माठात रात्री १०-१२ मोगऱ्याच्या टपोऱ्या कळ्या टाकनू ठेवा. त्या रात्रभरात कळ्या पाण्यातच उमलतील व माठाचं संपूर्ण पाणी सुगंधित होईल. सकाळी सर्व फुले काढून घ्या व ताज्या कळ्या पुन्हा पाण्यात टाका असे सुगंधित जल हे आरोग्यवर्धक असून, शरीरप्रकृती थंड ठेवण्यास फार उपयुक्त आहे.

४) मोगरा व चाफा फुलाच्या वासाने नाकातील फोड 'माळीण' बरी होते. 

५) मोगऱ्याच्या सुकलेल्या फुलांपासून शेतीसाठी उत्तम प्रतीचे पोषक व सूक्ष्म द्रव्ययुक्त सेंद्रिय खत बनविता येते. 

मोगऱ्याची फुले उन्हाळ्यात दोन ते तीनवेळा बहारावर येतात. इतर वेळेसही मोगऱ्याला फुले येतातच पण कमी बहार संपताच झाडाला थोडे शेणखत देऊन खुरपी करणे व पानाची हलकी छटाई करणे आवश्यक असते. मोगऱ्याला एक दिवसाआड पाणी द्यावे. 

असा हा बहुगुणी मोगरा शेती करणाऱ्यांना फारच अर्थ सहायक ठरतो. फुलांना किंमत जास्त येत असल्याने पैसा भरपूर मिळतो, म्हणून व्यावसायिक दृष्टीने देखील मोगऱ्याला महत्त्व आहे.

Read Also :-



तर मित्रांनो, वरील लेखात आपण मोगरा फुलां बद्दल माहिती जाणून घेतली. मला असे वाटते की मी तुम्हाला वरील लेखात सर्व काही माहिती दिली आहे. 

तसेच तुम्हाला आमचे वरील लेख कसे वाटले याच्याबद्दल comment box मध्ये नक्की कळवा. जर आमच्या लेखात काही चूक असेल तर नक्की सांगा आम्ही ते सुधारू. मित्रांनो तुमच्याकडे या लेखाबद्दल आणखी काही माहिती असेल तर आम्हाला सांगा आम्ही इथे समाविष्ट करू.

तर मित्रांनो, तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की share करा Facebook, Instagram आणि WhatsApp वरती.

आमच्या लेखाला वेळ दिल्यामुळे खूप खूप धन्यवाद 🙏



Post a Comment

0 Comments