कडुलिंब वनस्पती माहिती | Kadulimb plant Information                    


कढुलिंब' आपल्या रोजच्या वापरात येत असल्याने तो सर्वांच्या परिचयाचा आहे. खेड्यापाड्यात घरोघरी तसेच शहरात ज्यांच्याघरी मोकळी जागा आहे त्यांच्याकडे कढुलिंबाची झाडे आढळतात. पाहिजे तेवढी पाने फुकटात अथवा अल्प किमतीत मिळतात. अशी हिरवी राणी आहे बहुगुणी परंतु कढुलिंबाची पाने आपण कढी, भाजी, वडे, आमटी, चटण्या चिवडा इत्यादींसाठी उपयोग करतो त्याच्या वासाने या पदार्थाना वेगळी लज्जतदार चव येते. पक्कान्ने स्वादिष्ट, रुचकर बनतात. परंतु याचा केवळ एवढाच उपयोग नाही तर कढुलिंबात अनेक औषधी गुण व जीवनसत्व आहेत. त्याच्या पानांमधून ग्लुकोसाईड तले प्राप्त होते.

कढुलिंबात 'अ' जीवनसत्व, 'बी१,' 'बी२, 'सी,' कॅलशियम, पोटॅशियम, प्रोटीन, कार्बोहायड्रेड, फॉस्फरस, प्रथिने, लोह, नायसिन, सुगंधी तेल इत्यादिंचा सुंदर समावेश झालेला आढळतो. शिशिर ऋतुत, कडुनिंब, आंबा, पिंपळ, पळस इत्यादी झाडांची पाने गळतात. वसंत ऋतूत त्यांना पालवी येते परंतु कढुलिंबाची पाने गळत नाहीत, हे याचे वैशिष्ट्य.

कढुलिंबाचे औषधी उपयोग | Kadulimb plant Benifits


१) कढुलिंबाच्या पानात भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे, आम्ल, तेल असल्यामुळे ते शरीराला पोषक असे टॉनिक समजले जाते.

२) कढुलिंब बुद्धिवर्धक असून दाह, मुळव्याध, कृमी, शूल, सूज कोडासारख्या रोगावर नियंत्रण ठेवते व रोगाचा नाश करते.

३) लहान मोठ्या किटकाच्या विषावर कढुलिंबाचा रस वारंवार चोळावा विष उतरते. 

४) पानांचा काढा करून तो सेवन केल्यास उलटी तत्काळ थांबते.

५) कढुलिंबाच्या पानात कॅलशियम आणि 'सी' व्हिटमीन असल्यामुळे दात व हाडांचे आरोग्य चांगले राहते. त्वचा नितळ होते. नखे, दात, व केस यांना फायदा होतो. 

६) कढुलिंबाच्या पानाचा थेंबभर रस रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यात टाकला तर दृष्टी तेज होऊन डोळ्यांचे विकार बरे होतात.

७) लहान अर्भकाच्या मातेने कढुलिंबाची ८-१० पाने धुऊन रोज चावून खाल्ली तर मातेच्या दुधात वाढ होईलच शिवाय मुलाची आरोग्यदृष्ट्या वाढ चांगली होईल.

८) भजे, वडे, तळीव पदार्थ पचायला जड असतात कढुलिंबाच्या पानांचा उपयोग केल्यामुळे जड अन्न पचण्यास मदत होते. अपचनाने होणारी मळमळ आणि ओकारी यावर देखील पाने उपयोगी पडतात. 

९) हगवण, आव, मुळव्याध, पोटदुखी यावर पानांचा दोन चमचे रस मधासोबत चाटण घ्यावा म्हणजे आराम होतो.

१०) लघवी साफ नसेल तर दिवसातून ५-६ वेळा पाने चावून खा गुण येईल. 

११) कोणत्याही कारणाने शरीरावर सूज आली असल्यास तसेच तळपाय किंवा टाचेला भेगा पडल्या असल्यास पानांची चटणी वाटून ती त्या जागेवर रात्री लावावी.

१२) मधुमेहाचा विकार ज्यांना आहे त्यांनी कढुलिंबाचे भरपूर सेवन करावे लाभ होईल.

१३) कढुलिंबात लोह भरपूर असल्यामुळे ते रक्तवर्धक आहे. रक्त वाढविण्याशिय रक्तशुद्धीचे कार्य या पानांच्या सेवनामुळे होते त्यामुळे खाज-खरख्या चर्मरोगांवरही याचा चांगला प्रभाव पडतो.

१४) कढुलिंबाच्या तेलाचा उपयोग अनेक औषधांमध्ये केला जातो.

१५) या झाडांची फळे देखील औषधीयुक्त आहेत. फळांचा रस व लिंबाचा रस एकत्र करून खरजेवर लावावा.

१६) कढुलिंब भाजून त्याची बारीक पूड करून खोबरेल तेलात टाकली व ते तेल केसांना लावले तर केस काळेभोर होतात.

एकंदरित कढुलिंबाचा नियमित वापर म्हणजे स्वस्त आणि मस्त औषधी सेवन असे म्हणता येईल.

Read Also :-


तर मित्रांनो, वरील लेखात आपण कडुलिंब बद्दल माहिती जाणून घेतली. मला असे वाटते की मी तुम्हाला वरील लेखात सर्व काही माहिती दिली आहे. 

तसेच तुम्हाला आमचे वरील लेख कसे वाटले याच्याबद्दल comment box मध्ये नक्की कळवा. जर आमच्या लेखात काही चूक असेल तर नक्की सांगा आम्ही ते सुधारू. मित्रांनो तुमच्याकडे या लेखाबद्दल आणखी काही माहिती असेल तर आम्हाला सांगा आम्ही इथे समाविष्ट करू.

तर मित्रांनो, तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की share करा Facebook, Instagram आणि WhatsApp वरती.

 आमच्या लेखाला वेळ दिल्यामुळे खूप खूप धन्यवाद 🙏