Honey benifits and  Information | मध माहिती
Honey

मधाची माहिती | Honey Information


आपल्या देशात मधाचा उपयोग अत्यंत प्राचीन काळापासून केला जात आहे. पुराणातल्या कथांमधून देवांना अमरत्व प्राप्त करून देणाऱ्या अमृताचा उल्लेख आढळतो. देव लोकांत अमृत आहे किंवा नाही हे त्या देवांनाच ठावूक मात्र पृथ्वीतलावर मानवांना सुदृढ आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करू शकणारे अमृततुल्य मध भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे.

आयुर्वेदाचार्य वाग्भट म्हणतात की, “मध हे अद्वितीय असे औषध आहे! मधाबरोबर वनौषधी दिली तर त्या वनौषधीचे गुणधर्म तंतोतंत शरीरात उतरतात आणि रोग निर्मूलन होण्यास साहाय्य होते."

मध गोळा करण्यासाठी मधमाशा नाना रंगाच्या विविध आकाराच्या व नाना जातीच्या फुलांमधील रस गोळा करून आणतात. हा मघ प्रत्येक फुलांमध्ये नसून तो काही विशिष्ट जातीच्या फुलांमध्येच आढळून येतो. अशा प्रकारच्या फुलांमधील रस गोळा करण्याचे काम मधमाशा सतत करीत असतात. एक मधमाशी एका दिवसात असंख्य फुलांमधील रस गोळा करण्याचे काम करीत असते. आणि मधमाशा हा रस आपल्या पोळ्यामध्ये साठवून ठेवतात. त्या सर्व रसाचे मिश्रण म्हणजे मध होय.

सध्या जगात मधाच्या औषधी परिणामांविषयी संशोधन सुरू आहे. जंगलातील आदिवासी, मागासलेले लोक, कातकरी यांचा मध गोळा करण्याचा उद्योग असतो. पण त्यांची पद्धत पारंपरिक असते. यामध्ये मधाच्या पोळ्यातील अंडी व मधमाशा यांचे नुकसान होण्याचा संभव असतो. पाश्चात्य देशात वैज्ञानिक आणि आधुनिक पद्धतीने मघ काढला जातो. परंतु आपल्या देशात मधाचे उत्पादन करण्याच्या उद्योगाचा विकास पुरेशा प्रमाणात नाही. महाराष्ट्र, बंगाल, तामिळनाडू, पंजाब, मध्यप्रदेश या राज्यांमधून काही प्रमाणात वैज्ञानिक पद्धतीने मधाचे उत्पादन सुरू झाले आहे.

आस्ट्रेलिया, न्यूझिलँड, रशिया, स्कॉट लँड वगैरे देशातील मध उत्तम प्रतीचा असून ते प्रत्येक पोळ्यामधून विपुल प्रमाणात आढळतो. आपल्या देशात अनेक प्रांतात मघ मिळत असला तरी काश्मीरमध्ये तो जास्त प्रमाणात आढळतो.

मधामध्ये जवळ जवळ ५०-६० विभिन्न घटक असतात. त्यात जीवनसत्त्व अ,ब,क, लोह, तांबे, कॅलशियम, क्लोरीन, नायसिन, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, सल्फर आणि मॅगनिज असते. मधामध्ये फलशर्करा. ४२ टक्के तर द्राक्षशर्करेचे प्रमाण ३५ टक्के असते. ७० टक्के ग्लुकोजचे प्रमाण असते. ग्लुकोजचे वैशिष्ट्य असे की, ते रक्तात लगेच मिसळते आणि पचतेही. मघ उत्तम शक्ती दायक टॉनिक आहे. आजारपणात आपण रोम्यास 'ग्लुकोज डी' देतो. त्याऐवजी मध देणे जास्त हितकारक ठरेल. मध अनेक दिवस टिकून राहते. जुने मध अधिक उत्तम मानले जाते.

मघात अनेक औषधी गुण असतात. दोन-तीन हजार वर्षापूर्वी होऊन गेलेल्या हिप्पोक्रॅटस या वैद्यकशास्त्राच्या जनकाने मधाच्या उपयोगाला महत्त्व दिले होते. मधाच्या गुणांचा उल्लेख बायबल-कुराणातही आहे. चरक या भारतीय वैद्यकशास्त्राने सुद्धा मधाला औषध मानले आहे.

आयुर्वेदिक शास्त्रातच नव्हे तर, होमिओ व अॅलोपॅथीत सुद्धा मधाला औषपीदृष्ट्या मानाचे स्थान आहे. आयुर्वेदात अनेक प्रकारची चूर्णे, भस्मे, वनस्पतींचा पाला, रस वगैरे औषधांचा मधाबरोबरच उपयोग करण्यास सांगण्यात येते.


मधाचे औषधी उपयोग | Honey Benifits +16


1) लहान मुलांच्या मानसिक व शारीरिक विकासासाठी मघ हे उपयुक्त टॉनिक आहे. लहान मुलांना बद्धकोष्ठाच्या त्रासातून नियमित मघ देऊन मुक्त करता येऊ शकते. मधामुळे मुले निरोगी व सुदृढ होतात. 

2) मध शरीरात उष्णता निर्माण करून शक्ती वाढवितो. रक्तातील हिमोग्लोबीचे प्रमाण बाढवितो. कफ पातळ होऊन खोकला कमी होतो. क्षयरोग्यास दररोज सकाळी रात्री दुधाबरोबर दोन चमचे मध दिल्यास वजन वाढून लवकर गुण येतो.

3) दोन चमचे मधात एक चमचा लिंबूरस मिसळून तो सकाळ संध्याकाळ घेतल्यास रक्तदाब कमी होतो. 

4) मघात असलेल्या साखरेमुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात, यामुळे रक्ताभिसरण होण्यास मदत होते. मघातील लोहामुळे रक्तशुद्ध होण्यास मदत करते.

5) हृदयविकार असणाऱ्यांनी लसणाच्या २ ते ४ पाकळ्या रात्री दह्यात भिजवाव्या सकाळी उठल्यानंतर २ ते ४ विलायची व लवंगासह चावून खाव्या आणि एक कप मधमिश्रित दूध प्यावे हृदयविकारांना फायदा होतो.

6) पॅरालिसिस, अजीर्ण, हातापायांचा कंप, अशक्तता असलेल्यांनी रोज मधपाणी घ्यावे. 

7) लठ्ठपणा कमी करण्यासाठी आणि वजन घटविण्यासाठी लिंबूपाण्यात थोडा मघ मिसळून दररोज नियमितपणे घेतल्यास शरीरातील चरबी व वजन हमखास घटते.

8) रात्री जेवणाबरोबर रोज दोन चमचे मध घेतल्यास डोकेदुखी कमी होऊन शांत झोप लागते व मानसिक शारीरिक ताकदही वाढते. 

9) विस्तवामुळे भाजल्यास किंवा चाकू, कात्री इतर हत्यार याने जखम झाल्यास त्यावर मघ लावून पट्टी बांधावी जखम बरी होते. 

10) अंगाला खाज सूटत असल्यास रोज सकाळी तोंड धुतल्यावर इतर कोणतेही पेव घेण्या अगोदर ४ चमचे मध व तेवढेच पाणी नियमित एक महिनाभर घेतल्यास खाज कमी होते इतरही काही त्वचारोग असल्यास कमी होतात. 

11) आपला आवाज कायम मधुर व गोड राहावा म्हणून गायकांनी नेहमी मधाचे सेवन करावे.

12) जगातील दीर्घायुषी म्हणून प्रसिद्ध असलेले शेकडो लोक रशिया, तुर्कस्थान वगैरे देशात राहतात. हे लोक आपल्या आहारात मधाचा भरपूर प्रमाणात उपयोग करतात, असे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे.

13) डोळे चिकट होणे, खुपल्या येणे, जागरणाने किंवा अतिवाचनाने डोळे चुरचुरणे, दृष्टी कमी होणे अशा विकारात मधाचे दोन थेंब झोपण्यापूर्वी डोळ्यात टाकावे. प्रथम किंचित डोळे चुरचुरतात पण त्यानंतर चांगले वाटते. डोळे स्वच्छ होतात.

14) मध माशांच्या पोळात मिळणाऱ्या मेणामुळे त्वचा नितळ, कोमल बनते, तसेच आवळ्याच्या रसात मध मिसळून सरबत करावे त्यामुळे दृष्टिदोष सुधारतात. त्वचारोगही बरे होतात.

15) मधाचा उपयोग दूध, दही, तुपाप्रमाणे आपल्या रोजच्या आहारातही करता येतो. गांधी-विनोबा यांनो मधाचा आहारात उपयोग करून मधाची आहारदृष्ट्या उपयुक्तता

सिद्ध केली आहे.

16) मध कधीही गरम करून घेऊ नये, तूप आणि मध सम प्रमाणात कधीही एकत्र करून घेऊ नये. ताप असताना दूध आणि मधाचे मिश्रण घेऊ नये. पोटात विषारी पदार्थ गेला असल्यास मध देऊ नये. अतिरिक्त मध घेऊ नये. घेतल्यास मधाचा दुष्परिणाम टाळण्यासाठी कच्चे धणे व डाळिंब खावे.

एकंदरित शुद्ध मध व बनावट मध कसा समजावा असा प्रश्नच पडतो. मधात कापसाची वात बुडवा आणि पेटवा बात न तडतडता पेटत राहिली तर तो शुद्ध मध समजावा. शुद्ध मध कुत्रा कधीही खात नाही. मधाच्या या विविध औषधीगुणांमुळे मध हे. एकप्रकारचे अमृतच समजले जाते आणि आर्थिक दृष्टीने एक किफायदशीर जोडधंदा म्हणून आज अनेक उद्योजक प्रयत्न करीत आहेत.

Read Also :-

कमळ फुलांची माहिती

पारिजात फुलांची माहिती

• झेंडूच्या फुलांची माहिती

मोगरा वनस्पती माहिती

गुलाब फुलांची माहिती

तर मित्रांनो, वरील लेखात आपण मधा बद्दल माहिती जाणून घेतली. मला असे वाटते की मी तुम्हाला वरील लेखात सर्व काही माहिती दिली आहे. 

तसेच तुम्हाला आमचे वरील लेख कसे वाटले याच्याबद्दल comment box मध्ये नक्की कळवा. जर आमच्या लेखात काही चूक असेल तर नक्की सांगा आम्ही ते सुधारू. मित्रांनो तुमच्याकडे या लेखाबद्दल आणखी काही माहिती असेल तर आम्हाला सांगा आम्ही इथे समाविष्ट करू.

तर मित्रांनो, तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की share करा Facebook, Instagram आणि WhatsApp वरती.

      आमच्या लेखाला वेळ दिल्यामुळे खूप खूप धन्यवाद 🙏