जास्वंद फुला


जास्वंद फुलाची माहिती | Hibiscus flower Information

    
जास्वंदीचे फूल सर्वांच्या परिचयाचे आहे. जास्वंदाचे झाड पटकन वाढणारे व कमी जमिनीत वाढणारे असते. जास्वंद आपणाला अनेक रंगांत व अनेक प्रकारांत पहावयास मिळतात. पण अतिपरिचयात अवज्ञा म्हणतात ना तसा प्रकार जास्वंदाबाबत घडतो. जास्वंद सर्वत्र उपलब्ध असते. बराच काळ जास्वंदाचे फूल ताजे राहू शकते. पटकन मलूल होत नाही हे जास्वंदाचे एक वैशिष्ट्य समजले जाते. जास्वंदाला स्थानपरत्वे जया, जासुद, जास्वंद, जोबा, शोपलावर आदी नावाने ओळखले जाते.

जास्वंदाची लाल-पाढरी फुले औषधी उपयोगाची आहेत. थंड, गोड, स्निग्ध, पौष्टिक तसेच मलवर्धक केशवर्धक असे जास्वंदीचे गुण आहेत.

जास्वंद फुलांचे फायदे | Hibiscus flower Benifits


१) एकेरी पाकळीचा लाल भडक जास्वंद हा अतिशय गुणकारी असून किमान दोन फुलांच्या पाकळ्या चावून खाव्यात. त्याने कांती सतेज होते. केस काळे व लांब होण्यास मदत होते. 

२) अंगाचा दाह होणे, प्रमेह, मुळव्याघ, स्त्रियांचे प्रदर रोग, धातुरोग केस गळणे आदीवर जास्वंदाचा उपयोग केला जातो.

३) ग्लासभर पाण्यात सकाळी जास्वंदीच्या फूलपाकळ्या भिजवून ठेवा व सायंकाळी ते पाणी गाळून त्यात साखर घालून ते पाणी प्या, अंगाचा दाह शांत होईल व उष्णतेपासून होणारे विकार दूर होतील.

४) मार लागून सूज असल्यास त्यावर जास्वंदाच्या पानाचा लेप द्या दुखणे कमी होते.
 
५) जास्वंदीच्या फुलांचा रस आणि खोबरेल तेल याचे मिश्रण करून डोक्याला लावल्यास केस लवकर येतात. टक्कल असणाऱ्यांनी याचा प्रयोग करून पहावा.
 
६) फुलांचा रस केसांना लावल्यास केसांचा पांढरेपणा कमी होतो.

७) केस वाढण्यासाठी, लांब होण्यासाठी, पांढऱ्या केसांची वाढ वेळीच थांबविण्यासाठी या फुलाचे तेल उपयोगी आहे. आवळा, माका व लाल जास्वंदाची फुले समप्रमाणात घेऊन तयार केलेले केसांचे तेलामुळे केस गळणे थांबते व डोक्यावरील त्वचेला या तेलाने मसाज केल्याने केसाच्या मुळांची ताकद वाढते. 

८) काही स्त्रियांच्या हातापायांना भेगा तयार होऊन दुखतात कितीही तेल मलम लावले तरी उपयोग होत नाही अशावेळी जास्वंदीच्या पाकळ्या आणि गुलाबाच्या पाकळ्या दुधातून वाटाव्या तळपाय. स्वच्छ धुवावे व कोरडे करून रोज रात्री याचा लेप लावावा भेगा बऱ्या होतात.

९) लाल जास्वंदाची फुले तुपात तळून खाल्ली तर स्त्रियांच्या श्वेतप्रदर विकार कमी होतो. 

१०) फुलांचे पाणी घेतल्यास मळमळ, आम्लपित्त विकार थांबतात. 

११) फूलपाकळ्या वाटून त्याचा गर चेहऱ्यावर लावा व १० मिनिटाने स्वच्छ करा. कांती सतेज होईल. 

१२) खोबरेल तेलात जास्वंदाची पांढरी फुले वाटून घातली असता केसांचा रंग, पोत सुधारण्यास मदत होते. यामुळे केस गळणे थांबून केस मृदु व मुलायम होतात.

१३) अपचन वा अजिर्णामुळे संडास पातळ व वारंवार होत असल्यास पांढऱ्या जास्वंदीच्या फुलाच्या पाकळ्या बारीक वाटून कच्च्या बेलफळाच्या गरासह किंवा खडीसाखरे च्या पाण्यातून घ्याव्या हमखास गुण येतो.

१४) जास्वंदाच्या फुलांचे एक चमचा चूर्ण, एक कप दुधाबरोबर सकाळ-संध्याकाळी घेतल्यास शरीरातील रक्ताची कमी दूर होऊन रक्त वाढते आणि शरीरात स्फूर्ती आणि बलवृद्धी होते.

१५) जास्वंदाची फुले आणि पाने समभाग घेऊन ती वाळवावीत नंतर कुटून बाटलीत ठेवावी. रोज एक चमचा चूर्ण एक कप दुधाबरोबर नियमित घेतल्यास यौनशक्ती आणि स्मरण शक्ती वाढते.

१६) ही फुले स्त्रियांच्या प्रदरावर म्हणजे अंगावर पाणी जाण्याचा विकार असतो त्यावर रामबाण औषध समजले जाते. जेव्हा याचा वापर करावयाचा त्यावेळी जास्वंदीच्या ताज्या कळ्या आणून त्या तुपात मंद अग्नीवर भाजून घ्याव्या. या कळ्या रोज सकाळी एक या प्रमाणे दुधाबरोबर सेवन कराव्यात आणि औषध म्हणून गंधक रसायन या औषधाच्या २ गोळ्या घ्याव्यात.

अशी ही बहुगुणी फुले केवळ देवपूजेकरिता नसून औषधीयुक्त आहेत, त्याच बरोबर आर्थिक लाभ मिळवून देणारी आहेत.

Read Also :-

तर मित्रांनो, वरील लेखात आपण जास्वंद बद्दल माहिती जाणून घेतली. मला असे वाटते की मी तुम्हाला वरील लेखात सर्व काही माहिती दिली आहे. 

तसेच तुम्हाला आमचे वरील लेख कसे वाटले याच्याबद्दल comment box मध्ये नक्की कळवा. जर आमच्या लेखात काही चूक असेल तर नक्की सांगा आम्ही ते सुधारू. मित्रांनो तुमच्याकडे या लेखाबद्दल आणखी काही माहिती असेल तर आम्हाला सांगा आम्ही इथे समाविष्ट करू.

तर मित्रांनो, तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की share करा Facebook, Instagram आणि WhatsApp वरती.

     आमच्या लेखाला वेळ दिल्यामुळे खूप खूप धन्यवाद 🙏