पुदिना वनस्पती माहिती आणि औषधी गुणधर्म मराठी | pudina plant Information and Benefits in Marathi

पुदिना वनस्पती माहिती | pudina plant information

पुदिना वनस्पती माहिती | pudina plant Information


पुदिना ही एक महत्त्वपूर्ण औषधी व इतर महत्त्वपूर्ण गुणधर्म असलेली वनस्पती निसर्गाने उपलब्ध करून दिली आहे . विशेषत : उन्हाळ्यात आंब्याचे पन्हे आणि पुदिन्याची चटणी यांचा आहारात उपयोग हमखास करतात . थोडी तुरट व कडू अशी ही वनस्पती भाजी बाजारात सहज उपलब्ध होते . काळया जमिनीत घरच्या बागेत ती लावता येते . भाषा परत्वे ही वनस्पती पदिना , पुदिना , फुदीनो , मार्शमिण्ट अशा विविध नावाने ओळखली जाते . पुदिनाला उष्ण तसचे समशीतोष्ण हवामान , कमी थंडी , जास्ती उन्हाळा चांगला मानवतो . पुदिन्यात व्हिटॅमिन ए.बी -१ बी -२ , ई , कॅल्शियम , फॉस्फरस , लोह , प्रथिने, नायसि ऑक्झालिक अॅसिड, कर्बोदक इत्यादिचे भरपूर भांडाार असते. पुदिना सुगंधित, चवदार, पाचक, वातहर, वायूहर, कृमीनाशक इत्यादी गुणांनी युक्त आहे.

पुदिन्याचे औषधी गुणधर्म | Pudina plant Benifits


१) पदिन्याच्या पानाची चटणी गूळ किंवा साखर, आले, लसूण, कैरी, जीरे, मिठ टाकून करतात. महाराष्ट्र, गुजराथ, बंगाल या ठिकाणी पुदिना मिश्रित विविध प्रकारच्या चटण्या बनवून त्याने सेवन केले आते. याच्या नियमित सेवनाने शरीराला बळ मिळते, अन्न रुचकर लागले ते लवकर पचते.

२) उन्हाळ्यात घाम वाहून शरीरातील लोह, कॅल्शियम, फॉस्फरस इत्यादी खनिजे घामासोबत बाहेर पडतात. तेव्हा यांची उणीव भरून काढण्यासाठी पुदिन्याचे सेवन आवश्यक ठरते.

३) सामान्य ज्वर, वातविकार, जंत, अजीर्ण, पोटदुखी झाली असल्यास पुदिन्याच्या रसात काळे (पादेलोण) मीठ बारीक वाटून तो रस घ्यावा त्यामुळे बरे वाटते.

४) पुदिना बारीक वाटून त्याच्या चटणीचा लेप मस्तकावर बांधल्यास डोकेदुखी थांबू शकते. 

५) जास्त जोराने बोलणे, भाषण देणे, गाणे यामुळे घसा बसला असेल तर पुदिन्याचा काढा तयार करून गुळण्या कराव्यात.

६) पुदिन्याचा रस व मध यांचे चाटण दिल्याने घट्ट झालेला कफ पातळ होऊन बाहेर पडण्यास मदत होते. क्षय, दमा ब्राँकायटिसच्या रुग्णांना देखील याचा फायदा होतो. 

७) वांती व ओकारी झाल्यास पुदिन्याचा व लिंबाचा रस थोड्या पाण्यातून पाजल्याने बरे वाटू लागते.

८) पुदिन्याच्या रसात हळद पावडर मिसळून त्याचा लेप खरूज, इसब, गजकर्ण, नायटा यावर लावत राहिल्यास आराम वाटू लागतो. 

९) पुदिन्यातील जंतुनाशक घटक गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ यांना प्रतिबंध करण्यास उपयुक्त ठरतात. 

१०) पुदिन्यापासून मेन्थाल तेल काढण्यात येते. याचेच स्फटिक तयार करतात. यालाच मन्थाल किंवा पुदिन्याचे फूल अथवा थंडाई म्हणतात.

११) पुदिन्याची ताजी पाने चघळून खाल्यास दाताचे विकार, तोंडात दुर्गंध निर्माण करणाऱ्या जंतूचा नाश होण्यास मदत होते.

१२) विंचू चावल्यास त्या ठिकाणी पुदिन्याची चटणी, तुळशी वृंदावनातील माती दंशाच्या जागेवर बांधावी आग कमी होते.

१३) चेहऱ्यावरील मुरुम व शुष्क कातडी यावर रात्री पुदिन्याच्या चटणीचा लेप लावल्यास लाभ होऊ शकतो.

अशी ही अनमोल वनस्पती औषधी गुणाबरोबरच आर्थिक दृष्टीने देखील अतिशय महत्त्वाची आहे. भारतातील राज्याबरोबरच परकीय राष्ट्रात पुदिन्याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. यामुळे परकीय चलन मिळविता येईल. आपल्या देशात पुदिन्याच्या लागवडीपासून दरवर्षी अंदाजे ५०० ते ६०० टन पदिना अर्क (तेल) तयार होतो. पुदिन्याच्या या तेलाला रू.६०० ते१००० बाजारभाव मिळतो. म्हणून आर्थिक दृष्टीने देखील पुदिना लागवड महत्त्वाची आहे.

Read Also :-


तर मित्रांनो, वरील लेखात आपण पुदिना बद्दल माहिती जाणून घेतली. मला असे वाटते की मी तुम्हाला वरील लेखात सर्व काही माहिती दिली आहे. 

तसेच तुम्हाला आमचे वरील लेख कसे वाटले याच्याबद्दल comment box मध्ये नक्की कळवा. जर आमच्या लेखात काही चूक असेल तर नक्की सांगा आम्ही ते सुधारू. मित्रांनो तुमच्याकडे या लेखाबद्दल आणखी काही माहिती असेल तर आम्हाला सांगा आम्ही इथे समाविष्ट करू.

तर मित्रांनो, तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की share करा Facebook, Instagram आणि WhatsApp वरती.
     
      आमच्या लेखाला वेळ दिल्यामुळे खूप खूप धन्यवाद 🙏


Post a Comment

0 Comments